मोकाट जनावरे देतात अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST2021-08-21T04:17:47+5:302021-08-21T04:17:47+5:30
शहरातील विश्रामगृह ते जायंट्स चौक, रिंग रोड, ॲप्रोच रोडवर शेकडो मोकाट गायी, म्हशी रस्त्यावर बस्तान मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा ...

मोकाट जनावरे देतात अपघाताला आमंत्रण
शहरातील विश्रामगृह ते जायंट्स चौक, रिंग रोड, ॲप्रोच रोडवर शेकडो मोकाट गायी, म्हशी रस्त्यावर बस्तान मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे; तर अपघाताला आमंत्रण देण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक मुक्या जनावरांचा अपघातात मृत्यू झाला तर वाहनचालकही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत; परंतु यावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करावी; तसेच या जनावराच्या मालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. रस्त्याने चालणेही कठीण झाले; तर वाहनचालकाकडून जनावराला दुखापत झाली; तर जनावरांची मालक येऊन वाहनचालकांची तक्रार करून कारवाही करतात किंवा वारेमाप रक्कम उकळतात आणि पोलीस कारवाईसुद्धा करतात; यामुळे निर्दोष वाहनचालकांना नाहकच त्रास सहन करावा लागतो. याकडे पोलीस आणि नगर परिषदेच्या प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.