मोहन इंंगळे सभापतिपदी
By Admin | Updated: October 27, 2015 00:14 IST2015-10-27T00:14:12+5:302015-10-27T00:14:12+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकार गटाने बाजी मारली.

मोहन इंंगळे सभापतिपदी
धामणगाव बाजार समिती : भाजप, राकाँ, सहकार गटाचे वर्चस्व
धामणगाव रेल्वे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकार गटाने बाजी मारली. सभापतिपदी मोहन इंगळे तर उपसभापतीपदी दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांचा विजय झाला़
बाजार समितीची निवडणूक भाजप नेते अरूण अडसड यांच्या नेतृत्वात राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय भैसे, सहकारगटाचे नेते विजय उगले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांच्या नेतृत्त्वात लढविण्यात आली होती़ यात शेतकरी-शेतमजूर पॅनलने १८ पैकी १० जागा काबिज केल्या होत्या. तर आ़वीरेंद्र जगताप यांच्या गटाला आठ जागा मिळाल्या होत्या़ सोमवारी स्थानिक बाजार समितीत सभापती उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी भाजपा, राकाँ, सहकारगटाच्यावतीने मोहन इंगळे तर काँग्रेसच्यावतीने श्रीकांत गावंडे यांनी नामांकन दाखल केले. यात इंगळे यांना १० व गावंडे यांना ८ मते मिळालीत.