शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने सीबीआयची विश्वासार्हता संपविली, सिन्हांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 22:37 IST

राष्ट्र मंचतर्फे विविध मुद्द्यांवर आयोजित संवाद कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय हा देशाला नुकसानदायी ठरला

अमरावती - केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) हे हल्ली केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे या यंत्रणेत अपहार, भ्रष्टाचार वाढीस लागला. वरिष्ठांमध्ये सुंदोपसंदी सुरू झाली. सीबीआयमध्ये नेमके काय चालले हेच कळत नसून, सरकारनेच या यंत्रणेची विश्वासार्हता संपविली, असा घणाघाती आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सोमवारी अमरावती येथे केला. 

राष्ट्र मंचतर्फे विविध मुद्द्यांवर आयोजित संवाद कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय हा देशाला नुकसानदायी ठरला. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि सामान्यांना झळ पोहचली. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना पंतप्रधानांनी अद्यापही काळेधन आणले नाही. मात्र, नोटबंदीदरम्यान त्यांनी काही मित्रांचा काळा पैसा पांढरा केला. नोटबंदीनंतर आयकर विभागाने 18 लाख प्रकरणे दाखल केली, अशी जुमलेबाजी मोदी करतात. परंतु, जुमलेबाजी, धोकेबाजीने सरकार चालत नाही. रूपयांची घसरण होत असताना आता मोदी का बोलत नाहीत, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. देशाच्या अग्रणी असलेली यंत्रणा सीबीआयला भ्रष्टाचाराने पोखरले. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला गेला. ‘गुड गर्व्हनन्स’ कुठे आहे. केंद्र सरकारची वाटचाल सुशासन नव्हे, तर दु:शासनकडे सुरू असल्याची टीका त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती उघडपणे पत्रपरिषद घेऊन लोकतंत्र असुरक्षित असल्याची व्यथा मांडतात, हे कशाचे भाकित आहे, याचा विचार आता सामान्य जनतेला करावा लागेल. सरकारच्या अफलातून कारभारात देशात नवीन आणीबाणी लागू झाली असून, ते सन २०१९ च्या निवडणुकीत उलथवून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. राफेल विमान खरेदीत काय असेल ते पंतप्रधानांनी देशवासीयांपुढे येऊन बोलले पाहिजे. चूक झाली असेल तर देशवासियांची माफी मागावी, असेही सिन्हा म्हणाले. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री तथा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, आपचे खासदार संजय सिंग, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

ही तर मुख्यमंत्र्यांची धोकेबाजीअकोला येथे गतवर्षी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या ऐकून न घेता त्या मान्य केल्या. परंतु, वर्षभरानंतर एकही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची कृती ही जुमलेबाजी नव्हे, तर धोकेबाजी आहे. दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा, यासाठी 23 ऑक्टोबर रोजी अकोल्यात पुन्हा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन केले जात असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिली. 

राजकारणात चांगल्या लोकांनी यावेराजकारण हा गुंडांचा अड्डा, असे म्हटले जाते. मात्र, चांगली माणसे राजकारणात आली तरच देश सुरक्षित असेल, असा विश्वास सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला. मीसुद्धा सामाजिक दायित्वातून राजकारणात आलो, अशी कबुली त्यांनी दिली. चांगली व्यक्ती राजकारणात नसेल तर सत्ता सेवा नव्हे, तर मेवा ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार हा हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. नोटबंदी, जीएसटी, राफेल विमान खरेदीविषयी त्यांनी मोदींना लक्ष्य केले. 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी