'आयवॉच' महिलांसाठी आधुनिक शस्त्र

By Admin | Updated: March 22, 2015 01:27 IST2015-03-22T01:27:42+5:302015-03-22T01:27:42+5:30

शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ मदत देण्यासाठी 'आॅयवॉच' अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण केले.

Modern weapons for women 'iwatch' | 'आयवॉच' महिलांसाठी आधुनिक शस्त्र

'आयवॉच' महिलांसाठी आधुनिक शस्त्र

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ मदत देण्यासाठी 'आॅयवॉच' अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण केले. अद्याप अमरावतीच्या महिलांना मदतीची गरज भासली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत ३५० च्यावर महिलांनी 'आॅयवॉच' अ‍ॅप्स् डाऊनलोड केले आहे. मात्र आणखी जनजागृती झाल्यास महिलांसाठी 'आॅयवॉच' आधुनिक शस्त्राची भूमिका वठविणार आहे.
शहर पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी पुढाकार घेऊन महिला सुरक्षेच्या दृष्टीने मार्च महिन्याच्या सुरुवातीला आॅयवॉच अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण केले. महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातून तत्काळ मदत मिळण्याच्या उद्देशाने आॅयवॉच लोकार्पित करण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो महिलांनी आॅयवॉच अ‍ॅप्स् डाऊनलोड केले आहेत. त्यामध्ये ३० महिलांनी 'आॅचवॉच'वर क्लिक करुन अ‍ॅप्लिकेशनची कार्यप्रणाली तपासली आहे.
आतापर्यंत अलर्टचे बटन दाबून ३० महिलांनी पोलीस विभागाशी सपर्कंही केला आहे. मात्र मदतीच्या अपेक्षेने अद्याप पोलीस विभागाकडे एकही कॉल आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खऱ्या अर्थाने पोलीस विभागाला याबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. पोलीस विभागाकडून शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पॉपलेट लावून जनजागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Modern weapons for women 'iwatch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.