महापालिकेत अद्ययावत काँक्रीटवेट बेचिंग मशीन
By Admin | Updated: February 20, 2015 00:15 IST2015-02-20T00:15:06+5:302015-02-20T00:15:06+5:30
विवेकानंद कॉलनी येथे अत्याधुनिक कॉक्रीटवेट बेचींग मशीनद्वारे कॉक्रीट रस्त्यांचे भुमीपुजन महापौर चरणजीतकौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे आदींच्या हस्ते करण्यात आले.

महापालिकेत अद्ययावत काँक्रीटवेट बेचिंग मशीन
अमरावती : विवेकानंद कॉलनी येथे अत्याधुनिक कॉक्रीटवेट बेचींग मशीनद्वारे कॉक्रीट रस्त्यांचे भुमीपुजन महापौर चरणजीतकौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे आदींच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेत कॉक्रीट रस्त्यांचे बांधकामाचा दर्जा चांगला झाला पाहीजे याकरीता सर्व ठेकेदारांना आधुनिक मशीन आणण्याकरीता आयुक्त यांनी सांगितले होते. आयुक्ताच्या शब्दावरुन कंत्राटदार जुजर सैफी यांनी अत्याधुनिक कॉक्रीटवेट बेचींग मशीन आणून कॉक्रीट रस्त्यांचे बांधकामाची क्वालीटी व मटेरीयलचे निर्देशीत प्रमाणात होईल शिवाय रस्त्यांचे बांधकाम अतिशय जलद व उत्कृष्ट होईल. अशी माहिती आयुक्तांनी दिली. विवेकानंद कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदीरासमोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण रस्त्यांचे भूमीपूजन करुन महापौर व आयुक्त आदींनी मशीनचे प्रात्याक्षिक पाहीले.
यावेळी पाहुण्यांचे शाल, श्रीफल व संत गजानन महाराजाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, प्रभागाचे नगरसेवक प्रदीप हिवसे, माजी महापौर विलास इंगोले, माजी सभापती स्थायी समिती चेतन पवार, नगरसेवक धीरज हिवसे, प्रदीप बाजड, दिनेश बूब, राजेंद्र महल्ले, राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे, राजू मानकर, अरुण जयस्वाल, माजी नगरसेवक लकी नंदा, मनोज भेले व संत गजानन महाराज मंदीर विवेकानंद कॉलनी येथील संस्थानचे अध्यक्ष रविंद्र गायगोले, उमेश भगत, उपायुक्त विनायक अवघड, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, उपअभियंता पी.एम. देशमुख, अभियंता अविनाश रघटाटे, एम.बी. राऊत, एम.एन. राऊत, श्रीरंग तायडे, प्रमोद इंगोले, सचिन मांडवे, राजेश आगरकर, जी.एन. अटल, एस.एच. काजी, प्रमोद वानखडे, मंगेश कडू, जयंत काळमेघ, नितिन बोबडे, अशोक तट्टे, विवेक देशमुख, नितिन भटकर, शामकांत टोपरे, कंत्राटदार जुजर सैफी, मदनलाल मोंगा, राहुल प्रधान, मंगेश सराफ, उत्तम भंडके, भूषण राठोड, निखिल तिवारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)