ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता
By Admin | Updated: March 19, 2015 00:24 IST2015-03-19T00:24:19+5:302015-03-19T00:24:19+5:30
जिल्ह्यासह राज्यभरात चालू वर्षात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता
अमरावती: जिल्ह्यासह राज्यभरात चालू वर्षात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहे. या सर्व निवडणूकांमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आगामी काळातील सर्व निवडणुका सुरळीत व्हाव्यात याची पूर्वतयारी सुरु आहे. या निवडणुकांमध्ये भारत निवडणूक आयोगाप्रमाणे कार्यपध्दती अमलात आणली जाणार आहे. यासाठी राज्य शासन पुरेसा निधी पुरविणार आहे. यापूढे राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेशिवाय पोटनिवडणूक घेता येणार नाहीत. मात्र एखादे पद जातवैधता प्रमाणपत्रा अभावी रिक्त राहत असल्या त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना २०११ च्या जनगणने नुसार गुगल मॅपद्वारे केली जाणार आहे. यासाठी महाआॅनलाईनने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. मतदान शंभर टक्के होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. महिला बचत गटाबरोबरच महाविद्यालयीन तरुणांना जनजागृतीसाठी घेतले जाणार आहे.