बडनेरा रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:45+5:302021-06-02T04:11:45+5:30

फोटो पी ०१ बडनेरा बडनेरा : येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल घेण्यात आले. तब्बल एक ...

Mock drill at Badnera railway station | बडनेरा रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल

बडनेरा रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल

फोटो पी ०१ बडनेरा

बडनेरा : येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल घेण्यात आले. तब्बल एक तास आयुक्तालयातील विविध पोलीस यंत्रणेतील पथक तसेच आरपीएफ, जीआरपीचे अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून यावेळी सराव घेण्यात आला.

दहशतवादी हल्ला किंवा तत्सम गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेतील पथकांनी कठीण प्रसंग कसा हाताळला पाहिजे तसेच गुन्हेगारांना शिताफीने आपल्या कब्जात कसे घ्यावे, याचे मॉक ड्रिल बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी ११ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ येथे घेण्यात आले. रेल्वे स्थानकावर सशस्त्र जवानांच्या हालचालींमुळे येथे आलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, हे सरावसत्र असल्याचे माहीत झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजितसिंह राजपूत आरपीएफचे नरवार यांच्यासह इतरही कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Mock drill at Badnera railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.