मतमोजणीच्या १०० मीटर परिसरात मोबाई्ल वापरावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:37+5:302021-01-18T04:12:37+5:30
अमरावती : मतमोजणीच्या परिसरात १०० मीटरच्या आसपास मोबाईल फोन तसेच इतर प्रकारच्या संपर्क साधण्याच्या वस्तू वापरावर प्रतिबंध घालण्यात आले ...

मतमोजणीच्या १०० मीटर परिसरात मोबाई्ल वापरावर बंदी
अमरावती : मतमोजणीच्या परिसरात १०० मीटरच्या आसपास मोबाईल फोन तसेच इतर प्रकारच्या संपर्क साधण्याच्या वस्तू वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, अशा सूचना पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रविवारी दिली.
अमरावती तहसील विभागाची मतमोजणी विलासनगरातील शासकीय धान्य गोदामात, तर भातकुली तहसील विभागाची मतमोजणी चपराशीपुरास्थित महापालिकेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १३ येथे सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मतमोजणीच्या कामात कुठलाही अडथळा येऊ नये, त्या अनुषंगाने नियंत्रण ठेवण्याचे आदेश संबंधित ठाणेदारांना सीपी आरती सिंह यांनी दिले. सकाळी ८ वाजतापासून तर मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत भारतीय दंडसंहिता १८६० च्या कलम १८८ अन्यवे शिक्षापात्र अपराध केल्याचे मानण्यात येईल. शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) च्या अनुषंगाने मतमोजणीच्या १०० मीटर परिसरात मोबाई्ल वापरणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश देऊन सर्तकतेबाबत पोलीस विभागाच्या वाहनावरून पीए सिस्टीमव्दारे तसेच ध्वनीपेक्षकाव्दारे सूचना फ्रेजरपुरा व गाडगेनगरच्या ठाणेदारांना आरती सिंह यांनी दिल्या आहेत.