जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर सील

By Admin | Updated: August 21, 2014 23:32 IST2014-08-21T23:32:53+5:302014-08-21T23:32:53+5:30

जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी सहायक संचालक नगररचना विभागाला दिले. सदर विभागाने सदर मालमत्ता धारकाला मोबाईल टॉवर बंद करण्याकरिता नोटीस दिली.

Mobile Tower Seal at Jawahar Gate | जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर सील

जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर सील

अमरावती : जवाहर गेट येथील मोबाईल टॉवर बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी सहायक संचालक नगररचना विभागाला दिले. सदर विभागाने सदर मालमत्ता धारकाला मोबाईल टॉवर बंद करण्याकरिता नोटीस दिली.
सदर मालमत्ता धारकाने प्रतिसाद न दिल्यामुळे आयुक्त अरूण डोंगरे यांच्या निर्देशावरुन सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वात एटीसी कंपनीचे मोबाईल टॉवर सील करण्यात आले. सदर मालमत्ता धारकाने कोणत्याही प्रकारची परवानगी मनपाच्या कार्यालयाकडून प्राप्त केली नाही किंवा तसा कोणताही अर्ज महानगरपालिकेकडे सादर न केल्यामुळे सदर मालमत्ता धारकाला सदर विषयी त्वरीत खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
मनपा क्षेत्रातील जवाहरगेट स्थित गगलानी टॉवर यया इमारतीवरील ऐटीसी कंपनीचे अनधिकृत टॉवर होते. ही कार्यवाही सहा. आयुक्त सुषमा मकेश्वर, अतिक्रमण विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल, अभियंता लक्ष्मण पावडे, हेमंत महाजन, कर निरीक्षक कहाळे, अतिक्रमण निरीक्षक उमेश सवई, लिपीक पंकज डोनारकर व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile Tower Seal at Jawahar Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.