दर्यापुरात मोबाईल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST2021-01-19T04:17:07+5:302021-01-19T04:17:07+5:30

दर्यापूर : शहरातील रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दोन मोबाईल दुकानांमध्ये चोरी करून अनेक संच चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस ...

Mobile shop blown up in Daryapur | दर्यापुरात मोबाईल दुकान फोडले

दर्यापुरात मोबाईल दुकान फोडले

दर्यापूर : शहरातील रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दोन मोबाईल दुकानांमध्ये चोरी करून अनेक संच चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, बस स्थानक चौकातील रूपेश भुतडा यांच्या मोबाईल गॅलरीतील सात हजार रुपये रोख तसेच अडोतीस हजार रुपये किमतीचे मोबाईल, असेसरीज असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. विशेष म्हणजे, दुकानाचे कुलूप न तोडता चोरट्यांनी दुकानाचे टिन वाकवून प्रवेश केला. मरीमाता मंदिर येथील रोशन अग्रवाल यांच्या मोबाईल विक्री दुकानाच्या माळ्यावर जाऊन चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप पेचकसने तोडून दुकानात प्रवेश केला व मोबाईल, पावर बँक तसेच असेसरीज असा एकूण १ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. मरीमाता मंदिराजवळील राजकमल ज्वेलर्समध्येसुद्धा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही दिसत होते. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये चोरांच्या टोळीत मुलगीही सहभागी असल्याचे दिसून आले. या चोरांचा मार्ग शोधण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mobile shop blown up in Daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.