मतदान केंद्रांत मोबाईल बंदी

By Admin | Updated: April 21, 2015 00:04 IST2015-04-21T00:04:32+5:302015-04-21T00:04:32+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे निकष अन्य निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे. ..

Mobile ban in polling booths | मतदान केंद्रांत मोबाईल बंदी

मतदान केंद्रांत मोबाईल बंदी

१०० मीटरपर्यंत प्रतिबंध : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
रोशन कडू तिवसा
ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे निकष अन्य निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे. मतदान केंद्रांवर प्रवेश करतेवेळी मतदारांना त्यांचे भ्रमणध्वनी बाहेरच ठेवावे लागणार आहे. मतदान केंद्रांच्या १०० मीटरच्या आत उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी प्रचार करीत आहे, असे निर्दशनास आल्यास त्याला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे.
मतदान केंद्राचे १०० मीटरच्या आत प्रचार करणे निवडणूक कायद्याने गुुन्हा आहे.
असा प्रकार आढळल्यास वारंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. उमेदवाराचा निवडणूक मंडप केंद्रापासून २०० मीटरपलीकडे असेल. मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघात एखाद्या व्यक्तीकडून मतदानास अडथळा होईल, असा ध्वनीक्षेपक लावण्यात आला असेल तर मतदान केंद्राध्यक्ष तो बंद करु शकतो. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची छायाचित्रे छायाचित्रकाराला घेता येईल.
मतदार नसलेल्या कुठल्याही व्यक्तीला मतदान केंद्रात प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी मिळू शकत नाही. मतदारांना ने-आण करणाऱ्या वाहनांवर नजर
मतदारांची ने-आण करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आयोगाची करडी नजर राहणार आहे. अशी तक्रार प्राप्त झाल्यास त्याचवेळी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अन्वये १३३ अंतर्गत उमेदवारा- विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मतदार केंद्राच्या आत शस्त्र नेल्यास दोन वर्षे कारावास व दंडाची तरतूद केली आहे.

आक्षेपित मतांकरिता दोन रुपये शुल्क
मतदार यादीत नाव असताना मतदान प्रतिनिधीने मतदारावर आक्षेप घेतल्यास त्या आक्षेपासाठी दोन रुपये केंद्राध्यक्षाकडे जमा करावे लागणार आहे. चौकशीअंती आक्षेप सिध्द न झाल्यास अमानत रक्कम जमा केली जाणार आहे.

कडेवर मूल असलेल्या महिलांना प्राधान्य
मतदान केंद्रावर महिला, पुरुष व मतदारांच्या स्वतंत्र रांगा राहतील.अपंग व कडेवर मूल असलेल्या महिला मतदारांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. मुकबधीर मतदारांसमवेत इतर प्रतिनिधींना पाठवू नये, असे आदेश आयोगांनी दिले आहेत.

केंद्राध्यक्ष, प्रतिनिधींना घ्यावी लागणार शपथ
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२८ मधील तरतुदीनुसार मतदानाची गुप्तता राखण्यासाठी तरतूद असल्याने संबंधित प्रतिज्ञापत्राचे वाचन करुन मतदान अधिकारी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी यांना शपथ द्यावी लागणार आहे. प्रत्येक केवळ एकच प्रतिनिधी केंद्राच्या आत राहणार आहे.

Web Title: Mobile ban in polling booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.