राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:43+5:302021-07-07T04:15:43+5:30

जिल्हा कचेरीसमारे आंदोलन; रखडलेली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी अमरावती : राज्य लाेकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, पेंडिंग असलेल्या ...

MNS aggressive for State Public Service Commission exams | राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मनसे आक्रमक

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मनसे आक्रमक

जिल्हा कचेरीसमारे आंदोलन; रखडलेली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी

अमरावती : राज्य लाेकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, पेंडिंग असलेल्या नियुक्ती, पोलीस भरती व सरळसेवा भरती तातडीने घेण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करत याकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये

एमपीएससी आणि महाआयटीच्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल जाहीर करावा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या ३,६०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती त्वरित घ्याव्यात. सरळसेवा व मेगाभरतीसाठी अधिसूचना जारी करावी. रखडलेल्या ४१३ अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्यात. राज्य सरकारच्या वर्ग ३ व ४ च्या सर्व परीक्षा खासगी कंपनीकडून न घेता, एमपीएससीमार्फतच घ्याव्यात. तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्णवेळ नोकऱ्या द्याव्यात. ३ वर्षांपासून पोलीस भरती झाली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षे वाया गेले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपू शकते, त्यासाठी वयोमर्यादेत २ वर्षांची वाढ करावी व यासंबंधीचा शासन आदेश काढावा. महाआयटी या सरकारी कंपनीवर एसआयटी लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

वरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, भूषण फरतोडे यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, महानगराध्यक्ष संतोष बद्रे, कपिल निर्गुण, राज पाटील, भूषण फरतोडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धीरज तायडे, गौरव बांते, महिला सेवा जिल्ह्याध्यक्ष रीना जुनघरे, महिला सेना शहराध्यक्ष वृंदा मुक्तेवार, उपाध्यक्ष सचिन बावनेर आदी उपस्थित होते.

Web Title: MNS aggressive for State Public Service Commission exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.