शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले, हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 15:29 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, असं आमदार रवी राणा म्हणाले आहेत.

अमरावती : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याची जाहीर भूमिका घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यात अपक्ष आमदार रवी राणा यांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसेचं पठण करू असं आव्हान रवी  राणा यांनी केलं आहे. 

मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरवल्यास मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजविण्याच्या मनसेच्या भूमिकेमुळे पोलीस यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नुकतचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यादेखील काही महिलांसोबत हनुमान चालिसा पठण केल्याने चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण करून मंदिरावर भोंगादेखील लावणार असल्याचं म्हटलं आहे. 

आम्ही दोघे नेहमीप्रमाणे हनुमान चालिसा वाचणार असल्याचं नवनीत राणा यांनी जाहीर केलं. तर दुसरीकडे, रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं आहे. हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करावे, असे रवी राणा म्हणाले आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला आहे.

राज ठाकरेंनी दिलाय राज्य सरकारला इशारा 

पुढील महिन्यात ३ मेला देशभरता ईद साजरी केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती