आमदारांचे कोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST2021-01-19T04:17:05+5:302021-01-19T04:17:05+5:30

- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस. --------------------------- कोट ‘‘ जिल्ह्यात १३ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्यात, ही बाब जमेची ठरली आहे. ...

MLA quotes | आमदारांचे कोट

आमदारांचे कोट

- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

---------------------------

कोट

‘‘ जिल्ह्यात १३ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्यात, ही बाब जमेची ठरली आहे. या १३ ग्रामपंचायतींना खा. नवनीत राणा १० लाख रुपये विकासकामांसाठी निधी देतील. बडनेरा मतदारसंघाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी युवा स्वाभिमानचे उमेदवार निवडून आले आहे. ग्रामविकासासाठी आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल.

- रवि राणा, आमदार, बडनेरा.

------------------

काेट

‘‘ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपच्या विकासाची घोडदौड कायम आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची पावती आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील मंत्री, आमदार प्रचारात उतरले होते. मात्र, भाजप अशा परिस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर १९१ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर अभूतपूर्व यश मिळविले आहे.

- निवेदिता चौधरी (दिघडे), जिल्हाध्यक्ष, भाजप

----------------------

कोट

जिल्ह्यात ज्या पक्षाचा आमदार आहे, त्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. शिवसेनेही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर काँग्रेसनंतर घवघवीत यश मिळविले आहे. महाविकास आघाडीने गावस्तरावरही पकड कायम ठेवली आहे.

- राजेश वानखडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

--------------------------

‘‘ गत पंचवार्षिकपेक्षा यंदा ग्रामपंचायती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक जागांवर विजय मिळविला. अमरावती तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे.

- सुनील वऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: MLA quotes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.