चिखलदऱ्यात संमिश्र दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:36+5:302021-01-19T04:16:36+5:30

फोटो पी १८ चिखलदरा चिखलदरा : तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींच्या १६४ जागांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. प्रत्येक पक्ष सर्वाधिक ...

Mixed claims-counter-claims in the mud | चिखलदऱ्यात संमिश्र दावे-प्रतिदावे

चिखलदऱ्यात संमिश्र दावे-प्रतिदावे

फोटो पी १८ चिखलदरा

चिखलदरा : तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींच्या १६४ जागांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. प्रत्येक पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सदस्य निवडून आल्याचा दावा करीत असल्याने सरपंच निवडणुकीनंतर ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात, हे चित्र स्पष्ट होणार आहे. माजी सभापती रजनी बेलसरे, माजी उपसभापती पुण्या येवले, राजेश सेमलकर, शिवा काकड, विनायक कवडे, साधुराम पाटील, देविदास कोगे यांचे वर्चस्व पणाला लागले. ते सर्व निवडून आले. तालुक्यातील शहापूर, काजलडोह, सेमाडोह, सलोना, दहेंद्री, बागलिंगा, बिबा, मोथा, जामलीवन, बारूगव्हाण, डोमा, चिखली, आडनदी, कोहाना, रायपूर, एकताई, माखला, खटकाली, अढाव, काकादरी, आमझरी, खिरपाणी, तारूबांदा या ग्रामपंचायतीमध्ये मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक १३ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सदस्य निवडून आले असल्याचा दावा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी केला. ग्रामपंचायतीवर प्रहारचा झेंडा पडल्याचा दावा ‘प्रहार'चे तालुका संपर्कप्रमुख विनय लांजेवार यांनी केला. आठ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचे तालुकाध्यक्ष हिरुजी हेकडे यांनी सांगितले. प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला. मोथा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आणण्यात साधुराम पाटील यांना यश आले आहे.

-----------

Web Title: Mixed claims-counter-claims in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.