अपंगत्वावर मात करून मिथिलेशची झेप

By Admin | Updated: June 11, 2015 00:09 IST2015-06-11T00:09:31+5:302015-06-11T00:09:31+5:30

स्थानिक प्रतिष्ठीत व्यापारी धर्मेश जोशी यांचा मुलगा मिथिलेश अपंगत्वावर मात करून इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के ...

Mithilesh's rise by overcoming disability | अपंगत्वावर मात करून मिथिलेशची झेप

अपंगत्वावर मात करून मिथिलेशची झेप

८६.४० टक्के : गोल्डन किड्स हायस्कूलचा विद्यार्थी
वरूड : स्थानिक प्रतिष्ठीत व्यापारी धर्मेश जोशी यांचा मुलगा मिथिलेश अपंगत्वावर मात करून इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण संपादन केले. जन्मत:च तो ९५ टक्के कर्णबधिर आहे. परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि शिक्षणाच्या जिज्ञासेमुळेच त्याने यशोशिखर गाठले.
दररोज रोज सहा तास अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या आईने लहानपणापासून रोज चार ते पाच तास शिकवून स्पीच थेरपीद्वारे त्याची भाषा विकसीत केली. नंतर त्याला सामान्य शाळेत प्रवेश मिळाला. त्याला गणित विषयात १०० पैकी ८४ गुण मिळाले असून ज्या बधिरत्वामुळे अशी मुले भाषेमध्ये विकसीत होत नाहीत त्या विषयात मिथिलेशने यश संपादन केले. सद्यस्थितीत तो हिंदी, मराठी, इग्रजी व मारवाडी भाषा चांगल्या प्रकारे बोलतो.
तो त्याच्या वडिलांना व्यवसायात पूर्ण मदत करतो. त्याची मोठी बहीण प्रियंका जोशी ही सुद्धा २०१३ मध्ये इयत्ता दहावीत वरूड तालुक्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. यशाचे श्रेय तो मोठ्या बहिणीला तसेच शिक्षकांना देतो. भविष्यात त्याला आयआयटीमधून बायोमेडीकल इजिनीअरींग करायचे असल्याचे त्याने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mithilesh's rise by overcoming disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.