१००, १०१ क्रमांकाचा दुरुपयोग
By Admin | Updated: November 22, 2015 00:17 IST2015-11-22T00:17:04+5:302015-11-22T00:17:04+5:30
अतिसंवेदनशील कामकाज करणाऱ्या पोलीस व अग्निशमन विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी १०० व १०१ फोन क्रमांकावर येणाऱ्या बोगस कॉलच्या दुरुपयोगाने वैतागले आहेत.

१००, १०१ क्रमांकाचा दुरुपयोग
वैभव बाबरेकर अमरावती
अतिसंवेदनशील कामकाज करणाऱ्या पोलीस व अग्निशमन विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी १०० व १०१ फोन क्रमांकावर येणाऱ्या बोगस कॉलच्या दुरुपयोगाने वैतागले आहेत. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे या विभागाच्या कामकाजात व्यत्यय येत आहेत. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात तक्रार करण्याची तसदी सुध्दा दोन्ही विभागाने घेतली नाही.
जिल्ह्यात गुन्हेगारीसंदर्भात कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास नागरिकांच्या मदतीसाठी १०० क्रमांकाची सुविधा आहे. हा पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक असून त्यावर फोन केल्यास नागरिकांना काही वेळात मदत मिळते. त्याच प्रमाणे आपातकालिन स्थिती किंवा आगिच्या घटनांमध्ये मदतीसाठी १०१ क्रमांकाची सुविधा नागरिकांसाठी आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन्ही फोन क्रमांकावर बोगस कॉलचा अधीक येत आहे. या बोगस कॉलला दोन्ही विभाग वैतागले आहेत. यावर आजपर्यंत बीएसएनएलकडे तक्रार सुध्दा करण्यात आली नाही. या समस्येसंदर्भात माहिती घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधी भारतीय दूर संचार निगम कार्यालयात गेले. मात्र, बोगस कॉलविषयी पोलीस व अग्निशमन विभागाची तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. या क्रमांकावर शहरातील व विदर्भाबाहेरील बोगस कॉल येत असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.
या बोगस कॉलवर संवाद साधण्यात दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ गमावावा लागत आहे. यामध्ये बहुतांश बोगस कॉल मध्यरात्रीला येत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आजच्या अत्याधुनिक युगात इंटरनेटने जग जुळले आहे. मात्र, बोगस कॉल बंद करण्यास दोन्ही प्रशासकीय विभाग अद्याप पर्यंत हतबल आहे. या फोनवर कॉलर आयडी असतानाही बोगस कॉलवर कारवाई होत नाही. हे विशेष.