भाजपा सरकारकडून जनतेची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:16 IST2016-10-24T00:16:03+5:302016-10-24T00:16:03+5:30
भाजपा सरकार सैन्याच्या बलिदानाचेही राजकारण करीत आहे. अशा राजकारणाला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही,

भाजपा सरकारकडून जनतेची दिशाभूल
मुकुल वासनिक : काँग्रेसचा मेळावा
दर्यापूर : भाजपा सरकार सैन्याच्या बलिदानाचेही राजकारण करीत आहे. अशा राजकारणाला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही, सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. यांना जनता माफ करणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केले. ते दर्यापूर येथे आयोजीक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शनिवारी येथील तरुण उत्साही मैदानावर नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मेळावा घेण्यात आला.
व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे अमरावती प्रदेश काँग्रस कमिटीचे उपाध्यक्ष सुबोध मोहीते, महासचिव बंडु सावरबांधे आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेसचे नेते संजय खोडके, किशोर बोरकर, सतीश हाडोळे, शेखर शेखर शेंडे, जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, नगराध्यक्ष वंदना राजगुरे, अंजनगावच्या नगराध्यक्ष हनीफा बी मो. शरीफ, सुनिल गावंडे, बबन देशमुख, अनंत साबळे, सिध्दार्थ वानखडे, मंदाताई गावंडे विक्रमसिंग परिहार आदी प्रामुख्याने उपस्थिीत होते. प्रास्ताविक सुधाकर भारसाकळे यांनी तर संचालक अभिजीत देवके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज व्हा?
अच्छे दिनच्या नावावर भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. पीकनुकसानाची भरपाई, नाही, रोजगार नाही. सर्व बाजूने भाजपा सरकार अपयशी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने मध्ये काँग्रेचाच झेंडा फडकणार असून निवडणूका जिंकण्यासाठी सज्ज व्हा असा सल्ला आपल्या भाषणातून विधानपरिषेदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनीही आपल्या भाषणातून स्थानिक नेत्यांवर तोंडसूख घेतले.