शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन साळीवर भाऊजीची वाईट नजर; लादले गर्भारपण!

By प्रदीप भाकरे | Updated: January 31, 2023 15:27 IST

जावयाचा प्रताप: पिडितासह बहिणीला जीवे मारण्याची धमकी

अमरावती : आपल्याकडे कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही. आधी फक्त म्हणीतच तर कधी चेष्टेने ‘साली आधी घरवाली’ म्हटले जात होते. मात्र याच म्हणीचा अर्थ पुर्ण करण्याचा प्रयत्न चांदूरबाजार तालुक्यातील एका मेहुण्याने केला आहे. त्याच्या पराक्रमाची त्या पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली असून दोन्ही कुटुंबांना मात्र मान खाली घालण्याची वेळ आली आहे. तर या जावयाच्या पराक्रमामुळे सासरचे हैराण झाले आहेत. या मेहुण्याने चक्क अल्पवयीन साळीवर गर्भारपण लादले.

२२ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ या काळात त्या मेहुण्याने अल्पवयीन साळीचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ३० जानेवारी रोजी दुपारी त्यांच्याच हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय अनिल नामक जावयाविरूध्द बलात्कार, पोस्को व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, १७ वर्षीय फिर्यादी मुुलगी ही आरोपीची सख्खी साळी आहे. फिर्यादीची मोठी बहीण अर्थात आरोपीची पत्नी गर्भवती असल्याने घरकाम करण्याकरिता ती तिच्या बहिनीच्या घरी आली होती. दरम्यान, २२ जुलै २०२२ रोजी आरोपीने अल्पवयीन साळीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. घटनेची वाच्यता केल्यास बहिनीला घरातून हाकलून देईल, तुला व तुझ्या बहिणीला मारुन टाकेल अशा प्रकारची धमकी दिली. भीतीपोटी पिडिताने ती बाब कोणालाही सांगितली नाही. यातील आरोपीचे गाव व घटनास्थळ हे चांदूरबाजार तालुक्यात व ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हददीत येते.

असे फुटले बिंग

दरम्यान, २० जानेवारी रोजी पोट दुखत असल्याने पिडिता ही आईसोबत खाजगी दवाखान्यात गेली. त्यावेळी तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. याप्रकरणी दुसऱ्याच दिवशी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी जावयाविरूध्द त्यावेळी गुन्हा दाखल केला. तो ३० जानेवारी रोजी घटनास्थळ ज्या पोलिसांच्या हद्दीत येते, त्या ब्राम्हणवाडा थडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास आरंभला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंग