भूलथापा देऊन अमरावतीच्या अल्पवयीन मुलीवर वाशिममध्ये बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:10 IST2018-01-09T11:09:11+5:302018-01-09T11:10:22+5:30
निखळ मैत्रीच्या भूलथापा देऊन अमरावती येथील एका अल्पवयीन मुलीला वाशिमच्या फेसबुक फ्रेंडने तेथे बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

भूलथापा देऊन अमरावतीच्या अल्पवयीन मुलीवर वाशिममध्ये बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निखळ मैत्रीच्या भूलथापा देऊन अमरावती येथील एका अल्पवयीन मुलीला वाशिमच्या फेसबुक फ्रेंडने तेथे बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. फे्रजरपुरा पोलिसांनी रविवारी याप्रकरणी भादंविच्या कलम ३७६ (२), (जे), ५०६, सहकलम ४ पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.
वसीम अब्दुल (रा. वाशिम) असे आरोपीचे नाव आहे. अमरावतीतील या मुलीची फेसबुकवरून आरोपी वसीमशी ओळख झाली होती. दोघांमध्ये दीड वर्षे मैत्रीपूर्ण संबध राहिले. भेटीगाठी होत होत्या तसेच मोबाईलवर चॅटिंग सुरू झाले. ११ आॅगस्ट रोजी आरोपीने पीडित मुलीला वाशिमला बोलाविले. निखळ मैत्रीच्या भूलथापांना बळी पडलेली मुलगी वाशिमला पोहोचली. वसीमने तिला त्याच्या राहत्या घरी नेले. घरी कोणी नव्हते. ही संधी साधून वसीमने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन पुन्हा भेटण्यासाठी दबाव टाकला, अशी तक्रार तिने पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंत चिमोटे करीत आहेत.