नगरविकास राज्यमंत्र्यांनी केली स्वच्छतागृहाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:16 IST2017-09-23T23:16:23+5:302017-09-23T23:16:40+5:30
शहर विकासाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाला अधिक महत्त्व दिल्याने नगरविकास राज्य मंत्र्यांनी सार्वजनिक शौचालय बांधकामाची पाहणी करून प्रशासन व पदाधिकाºयांचे कौतुक केले.

नगरविकास राज्यमंत्र्यांनी केली स्वच्छतागृहाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : शहर विकासाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाला अधिक महत्त्व दिल्याने नगरविकास राज्य मंत्र्यांनी सार्वजनिक शौचालय बांधकामाची पाहणी करून प्रशासन व पदाधिकाºयांचे कौतुक केले.
धामणगाव शहराचा विकासात्मक कामाचा दुसरा टप्पा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या मार्गदर्शनात पूर्ण होत आहे. शहरात २२ सार्वजनिक शौचालये पूर्णत्वास येत आहेत़ ९०० वैयक्तिक शौचालयांपैकी ७२० शौचालये पूर्ण झाले आहेत़ आज नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाची पाहणी केली़ यावेळी माजी आमदार अरूण अडसड, नगराध्यक्ष आदी उपस्थित होते.