राज्यमंत्र्यांच्या ओएसडींचे फेसबुक अकाऊंट हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:35+5:302021-02-05T05:23:35+5:30
परतवाडा : राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) असलेले अनिल भटकर यांचे फेसबुक अकाऊंट ...

राज्यमंत्र्यांच्या ओएसडींचे फेसबुक अकाऊंट हॅक
परतवाडा : राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) असलेले अनिल भटकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. अनिल भटकर यांनी स्वत: याविषयी व्हाट्सअॅप ग्रुपवरून माहिती दिली आहे.
हॅकर्स फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून बऱ्याच व्यक्तींना पैशांची मागणी करीत आहेत. त्याने पैशाच्या मागणीचे संदेश बऱ्याच व्यक्तींना पाठविले आहेत. त्याअनुषंगाने कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन भटकर यांनी केले. खोट्या फेसबुक संदेशाच्या अनुषंगाने काहींनी अनिल भटकर यांना फोन केला. त्यामुळे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयीची सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे भटकर यांनी ‘लोकमत'ला सांगितले. भटकर हे यापूर्वी अचलपूरचे तहसीलदार होते.