श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्तमंत्री

By Admin | Updated: May 2, 2017 00:47 IST2017-05-02T00:47:20+5:302017-05-02T00:47:20+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्त व नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली.

Minister of State for Finance as the Director of Shri Gurudev Seva Mandal | श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्तमंत्री

श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्तमंत्री

गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्त व नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली.
अ.भा. श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी त्यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिवाय राष्ट्रसंताची कर्मभूमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे ते प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या निवडीने गुरु देव सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Minister of State for Finance as the Director of Shri Gurudev Seva Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.