हातगाड्या की मिनी वाईनबार ?

By Admin | Updated: August 24, 2014 23:11 IST2014-08-24T23:11:21+5:302014-08-24T23:11:21+5:30

शहरातील आमलेट-पावच्या हातगाड्यांवर सायंकाळनंतर मद्यप्रेमी सर्रास मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अलीकडे अंड्यांच्या काही गाड्यांवरून सर्रास दारूविक्रीही केली जात

A mini-wanbar of the handgun? | हातगाड्या की मिनी वाईनबार ?

हातगाड्या की मिनी वाईनबार ?

पोलिसांचे दुर्लक्ष : रस्त्यावर दारुची खुलेआम विक्री
वैभव बाबरेकर - अमरावती
शहरातील आमलेट-पावच्या हातगाड्यांवर सायंकाळनंतर मद्यप्रेमी सर्रास मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अलीकडे अंड्यांच्या काही गाड्यांवरून सर्रास दारूविक्रीही केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आले. राजापेठ व कोतवाली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर रात्री थाटल्या जाणाऱ्या या गाड्यांवर रात्री वाढणारी वर्दळ पाहिली की या अंड्यांच्या गाड्या की मिनी वाईनबार? असा प्रश्न उपस्थित होतो.
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'या प्रचलित म्हणीनुसार अंड्यापासून निर्मित विविध पदार्थांच्या शौकीनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात शहरात अंडी व अंडीजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांची संंख्या वाढली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आमलेट पावच्या हजारांवर गाड्या आहेत. या गाड्यांवर आॅमलेट,, बॉईल फ्राय, बॉईल भुर्जी अंडाकरी आदी पदार्थांची विक्री होते. अंड्याकडे ‘स्नॅक्स’ म्हणूनही पाहिले जाते. मद्यशौकिनांना'स्टार्टर'म्हणून अंड्यांपासून निर्मित केलेला ‘मेन्यू’च आवडतो.
तरुण, अल्पवयीन मुलांची गर्दी
सायंंकाळ होताच हळूहळू ठिकठिकाणच्या अंडे विक्रीच्या गाड्यांवर तरुणांची गर्दी होऊ लागते. यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. दारु दुकानातून मद्य खरेदी करुन अंडे विक्रीच्या गाड्यांवरील पदार्थांचा निवांतपणे आस्वाद घेत मद्य प्राशन करणारी ही मंडळी पाहिली की अंगावर शहारे येतात. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हायलाच हवी.

Web Title: A mini-wanbar of the handgun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.