मिनी बीडीओंना सीईओंनी सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:11 IST2017-12-15T23:10:36+5:302017-12-15T23:11:02+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत चार ओडीएफ झाले असून, धारणी व चिखलदरा वगळता इतर १२ तालुके ३१ डिसेंबरपर्यंत ओडीएफ करण्यात येणार आहेत.

The Mini BDO have been told to the CEO | मिनी बीडीओंना सीईओंनी सुनावले

मिनी बीडीओंना सीईओंनी सुनावले

ठळक मुद्देआढावा बैठक : ‘ओडीएफ’साठी जिल्हा परिषदेची विशेष मोहीम

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यातील आतापर्यंत चार ओडीएफ झाले असून, धारणी व चिखलदरा वगळता इतर १२ तालुके ३१ डिसेंबरपर्यंत ओडीएफ करण्यात येणार आहेत. सध्या धारणी व चिखलदरा तालुके हगणदारीमुक्त जिल्ह्यासाठी अडचण ठरत आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी वरील दोन तालुक्यांतील बीडीओ, सहायक बीडीओ व मिनी बीडीओंची बैठक घेतली.
संबंधित मिनी बीडीओ यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या ग्रा.पं.चा गावनिहाय आढावा घेतला. यावेळी ज्या मिनी बीडीओंची प्रगती समाधानकारक नसल्याने सीईओंनी ताकीद नोटीस बजावली आहे. यापुढील आढावा २३ डिसेंबर रोजी धारणी येथे घेतला जाणार आहे. तोपर्यंत कामात प्रगती दिसून न आल्यास कठोर कारवाईचा इशाराही सीईओंनी दिला आहे. २३ ते २५ डिसेंबर रोजी सीईओ कुळकर्णी दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायती प्रजाकसत्ताक दिनापूर्वी हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटी देऊन वैयक्तिक शौचालये व इतर कामाची पाहणीसुद्धा करणार आहेत. याचवेळी बैठकीत ग्रामसचिवाने मुख्यालयाचे ठिकाणी नुसते हजरच नाही, तर मुक्कामी राहिले पाहिजेत, असे आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांना दिले आहेत. आकस्मिक भेटीदरम्यान मला किंवा मिनी बीडीओंना आढळून आल्यास किंवा ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक गैरहजर असल्याबाबत तक्रार केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना बैठकीत कुलकर्णी यांनी दिल्या. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे, नरेगाच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे उपस्थित होत्या.
अधिकारी करणार मुक्काम
धारणी तालुक्यातील ६२ पैकी ३० ग्रामपंचायती, तर चिखलदरा तालुक्यातील ५३ पैकी ४२ ग्रामपंचायती १५ जानेवारीपर्यंत ओडीएफ होतील, असे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले. धारणीमधील ३२ व चिखलदरा तालुक्यातील ११ ग्रामपंचायती अशा एकूण ४३ ग्रामपंचायतींमध्ये सीईओंच्या संकल्पनेतून २२ ते २४ जानेवारी या तीन दिवसांत दोन्ही तालुक्यांतील उर्वरित ४३ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी एकाच वेळेला मुक्कामी राहून सर्व तीन दिवसांत हगणदारीमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

Web Title: The Mini BDO have been told to the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.