बेलाेरा विमानतळाच्या जमिनीतून खनिज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:12 IST2021-01-14T04:12:26+5:302021-01-14T04:12:26+5:30
अमरावती : बेलाेरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीतून अवैधरीत्या खनिज चोरी होत असल्याची घटना ७ ते १२ जानेवारी दरम्यान ...

बेलाेरा विमानतळाच्या जमिनीतून खनिज चोरी
अमरावती : बेलाेरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीतून अवैधरीत्या खनिज चोरी होत असल्याची घटना ७ ते १२ जानेवारी दरम्यान निभोंरा लाहे येथे निदर्शनास आली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले असून, दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविला.
मनीष शिवनाथ मेश्राम (२९, सावळापूर पूर्णा, अचलपूर), खुशाल राठोर (३०, गोदेगाव, दारव्हा जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. बेलोरा विमानतळाचे व्यवस्थापक मुंकुद पाठक यांनी याबाबत फिर्याद नोंदविली. पोलीस सूत्रानुसार, ७ जानेवारी रोजी रात्री १०.४५ वाजता निंभोरा लाहे येथून ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३०, जे ५७०३ व एम.एच. २७ यू २५८५ चा चालक मनीष मेश्राम आणि ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. २७, यू ४५२२ चा चालक खुशाल राठोर हे दोघेही भूसंपादित जागेतून माती चोरून नेताना दिसून आले. नांदगाव खंडेश्र्वरचे तहसीलदार यांनी हे दोन्ही ट्रॅक्टर, ट्रॉलीसह बडनेरा पोलिसांत जमा केले होते. मात्र, या घटनेची तक्रार १२ जानेवारी रोजी मुकुंद पाठक यांनी नोंदविली. त्यानुसार ट्रॅक्टर चालकांविरुद्ध भादंविच्या ३७९, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी बडनेरा पोलीस तपास करीत आहे.