रस्त्याच्या मुरुमासाठी लाखोंची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:09+5:302021-07-27T04:13:09+5:30
शहराचे विस्तारीकरण होत असताना रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांकडे मात्र, दुर्लक्ष आहे. किंबहुना पावसाला आला की नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे व व ...

रस्त्याच्या मुरुमासाठी लाखोंची उड्डाणे
शहराचे विस्तारीकरण होत असताना रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांकडे मात्र, दुर्लक्ष आहे. किंबहुना पावसाला आला की नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे व व त्यांच्या प्रशासनाकडे हे समीकरण ठरलेले आहे. याही पलीकडे म्हणजे डांबरीकरण झालेले रस्ते ठिकठिकाणी उखडले असल्याने त्याला किमान मुरुमाचे तरी ठिगळ लावा अशी, नागरिकांची मागणी आहे. आता डांबरीकरणाच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे उखडलेले रस्ते आणि लावण्यात येणारे ठिगळ यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडावत आहेत. ही आणखी एक समस्या समोर आलेली आहे. मुळात रस्त्यांचे डांबरीकरण योग्य प्रकारे न झाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत त्याला मोठमोठी खड्डे पडतात, कामाचा दर्जा व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अभियंत्यांवर असताना बेपवाई झाल्याने पावसाळ्यात ही स्थिती उद्भवली आहे. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये रस्त्यांची मोठी समस्या उद्भवत आहे. नियमबाह्य लेआऊटमध्ये ही समस्या उद्भवत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मागील वर्षी ७५ लाख तर यंदा किमान १ कोटीच्या मुरुमाचा उतारा निघाला आहे.
बॉक्स
दोन कंत्राटदारांशी दरकरार
यंदा मुरुमांकरिता दोन कंत्राटदारांशी दरकरार करण्यात आलेला आहे. त्यांच्याद्वारा शहरातील खराब रस्त्यांवर मुरूम टाकण्यात येत आहे. पाच ते सहा मीटरचा मुरूम एका वाहनांमध्ये असतो व त्या स्टॅगनुसार बिल काढण्यात येणार आहे. पाऊस उशिरा आल्याने मुरूम टाकण्याची प्रक्रियादेखील उशिराच सुरू झाली. सध्या झोन ५ मध्ये १९६, दोन व तीनमध्ये प्रत्येकी १५ ट्रक मुरूम टाकण्यात आलेला आहे.
बॉक्स
कर पूर्ण, सुविधा मात्र अपूर्ण
महापालिकेद्वारा नागरिकांना सर्व करांची आकारणी केली जाते. विहीत कालावधीत भरणा न केल्यास दंडाची आकारणीदेखील केल्या जाते. त्या तुलनेत सुविधा मात्र अपूर्ण आहे. याकडे प्रशासनाचेच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधादेखील दिल्या जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
बॉक्स
रस्त्यात साचले पाण्याचे डबके
अनेक भागातील रस्त्यांचा योग्य उतार नसल्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे डबके साचणे व पर्यायाने रस्ते उखडल्या जात आहे. महापालिकचा निधीची वाट लागत असताना कुठलीही चौकशी केल्या जात नाही किंवा संबंधितांवर कारवाई केल्या जात नसल्याने पावसाला आता की नागरिकांना चिखलात रस्ता शोधावा लागत असल्याचे वास्तव आहे.
पाॅइंटर
झोन क्र. अपेक्षित खर्च
झोन क्रमांक १ २० ते २५ लाख
झोन क्रमांक २ १२ ते १३ लाख
झोन क्रमांक ३ १५ ते १६ लाख
झोन क्रमांक ४ १९ ते २० लाख
झोन क्रमांक २५ ते २८ लाख
कोट
यंदा मुरूम टाकण्याकरिता दोन कंत्राटदारांशी दरकरार करण्यात आलेला आहे. पावसामुळे थोडा उशीर झाला, आता आवश्यकतेनुसार मुरूम टाकण्यात येत आहे. नव्वद लाख ते १ कोटीपर्यंत यावर खर्च होईल
रवींद्र पवार
शहर अभियंता
बॉक्स
प्रशासनावर दोषारोपण करण्यात काहीही अर्थ नाही. मुळात सत्तापक्षाचे नियोजनच नसल्यामुळे शहरातल्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांची हालत खराब झालेली आहे. याचा नागरिकांना होत आहे.
बबलू शेखावत
विरोधी पक्षनेता