एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:28+5:302021-03-13T04:22:28+5:30

माजी कृषिमंत्र्यांसह २० विद्यार्थ्यांना डिटेन करून सोडलेअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे १४ मार्च रोजी होऊ घातलेली महाराष्ट्र राज्य लोकसेवा ...

Mild lathicharge on MPSC agitating students | एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज

एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज

माजी कृषिमंत्र्यांसह २० विद्यार्थ्यांना डिटेन करून सोडलेअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे १४ मार्च रोजी होऊ घातलेली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला. याविरोधात अमरावती येथील पंचवटी चौकात गुरुवारी दुपारी ४ वाजता विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. दरम्यान विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी २० विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस व्हॅनमधून विद्यार्थ्यांना नेले जात असताना माजी कृषिमंत्री अनिल बोंडे घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थ्यांना व्हॅनमधून बाहेर काढा, असे बोंडे म्हणाले. यावरून गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले आणि बोंडे यांच्या तू-तू मै-मै झाली. पोलीस आयुक्तालयात महापौर चेतन गावंडे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदी पदाधिकारी पोहोचले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांबाबत आंदोलक विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर चर्चा झाली. त्यानंतर डिटेन केलेले आंदोलन विद्यार्थ्यांसह अनिल बोंडे यांना सोडण्यात आले.

Web Title: Mild lathicharge on MPSC agitating students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.