सीपींच्या कारवाईने मध्यरात्रीची वर्दळ कमी
By Admin | Updated: October 30, 2016 00:12 IST2016-10-30T00:12:22+5:302016-10-30T00:12:22+5:30
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सुरू केलेल्या 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहिमेमुळे शहरातील मध्यरात्रीची वर्दळ कमी झाली आहे.

सीपींच्या कारवाईने मध्यरात्रीची वर्दळ कमी
वाहन तपासणीवर जोर : अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सुरू केलेल्या 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहिमेमुळे शहरातील मध्यरात्रीची वर्दळ कमी झाली आहे. या कारवायामुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नेत्तृत्वात शहरात मध्यरात्री गस्त घालण्यात येत आहे. मंडलिकांच्या दंबग कारवाईमुळे पोलीस यंत्रणा सळो की पळो झाली आहे. मात्र, या प्रकारच्या कारवाईमुळे गुन्हेगारासंह अवैध धंद्यांवर अंकुश ठेवणे शक्य आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेत. अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली. वाहनांची तपासणी मध्यरात्री करण्यात आली. त्यामुळे नियमबाह्य काम करणारे नागरिक रस्त्यावर फिरणाऱ्यास धास्तावले आहे. शहरात मध्यरात्री अनेक विद्यार्थी विनाकारण फिरतात, त्यांनीही पोलिसांचा चांगलाच चाप बसला आहे. पोलीस आयुक्तांनी शहरात गस्त घालून विना परवाना दारू पिणाऱ्यावर कारवाई केली. त्यातच छुप्या मार्गाने दारू पिणाऱ्यांचे अड्डे उध्दस्त केले. त्यामुळे मध्यरात्री शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
शुक्रवारी मध्यरात्रीची कारवाई
शुक्रवारी मध्यरात्री पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना, विवेक पानसरे व प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात १५ अधिकारी व १०० पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात गस्त व नाकाबंदी केली. त्यामध्ये ५१० वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या ९७ वाहनावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहे. नाकाबंदीदरम्यान शहर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक चौकात ७० वाहनांची तपासणी केली. त्यात २८ वाहनावर कारवाई केली. शेगाव नाका परिसरात ६५ वाहनांची तपासणी करून २१ वाहनावर कारवाई केली. ज्ञानमाता हायस्कुलजवळ ४५ वाहनांची तपासणी करून २० वाहनावर कारवाई केली. दस्तुर नगरात वाहन क्र. एमएच २९ एडी-५७०० मधून विदेशी दारूचा माल जप्त केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ही मोहीम राबविली जात आहे.