शाळेची पहिली घंटा वाजविण्यापूर्वीच निरोप
By Admin | Updated: June 28, 2016 00:02 IST2016-06-28T00:02:39+5:302016-06-28T00:02:39+5:30
सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने रविवारी पूर्ण तयारीची पाहणी करून घरी परत येत असताना काळाने त्याचेवर झडप घातली ...

शाळेची पहिली घंटा वाजविण्यापूर्वीच निरोप
दुनी येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू : प्रवेशोत्सवावर विरजण
श्यामकांत पाण्डेय धारणी
सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने रविवारी पूर्ण तयारीची पाहणी करून घरी परत येत असताना काळाने त्याचेवर झडप घातली आणि शाळेची घंटेचा पहिला ठोका वाजण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. पाहता पाहता शिक्षण क्षेत्रातील प्रवेशोत्साहावर विरजण पडले. चंद्रकांत बापूराव पाटील (३५, रा. कासारे, ता. साखरी, जि. धुळे) हे जि. प. पूर्व माध्यमिक शाळा दुनी येथे मुख्याध्यापक होते. ते रविवारी शाळेची पाहणी करून दुनीवरून रात्री ८ वाजतादरम्यान धारणीकडे निघाले. अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावर बोड फाट्याजवळ त्यांचे दुचाकी एमएच १९ बीझेड १३४८ वरील ताबा सुटल्याने ते डावीकडील रस्ता हद्दीवरील डब्यावर आढळले. त्यांचे डोके बाजूच्या दगडावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांनी दुनी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण करून स्वागत करण्याच्या तयारीचा आढावा घेतला व परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबाचे स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यातील संपूर्ण शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.