आवास योजनेच्या अर्जदारांना ‘मॅसेज’
By Admin | Updated: May 22, 2016 00:09 IST2016-05-22T00:09:18+5:302016-05-22T00:09:18+5:30
प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ योजनेची अमरावतीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आवास योजनेच्या अर्जदारांना ‘मॅसेज’
पुढील वर्षी अंमलबजावणी : सायबर कॅफेमधून मिळणार पावती
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ योजनेची अमरावतीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने ७०१८ घरांना मान्यता प्रदान केली असून नागरिकांना अर्ज ‘ओके’ असल्याचे ‘मॅसेज’ येत आहेत. मात्र या योजनेतून घरकूलंचा लाभ हे पुढील वर्षी मिळेल, ही बाब यंत्रणेने स्पष्ट केलीे आहे.
मावळते महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी त्वरेने अर्ज मागविले होते. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज गोळा केल्यानंतर सदर यादी राज्य शासन त्यानंतर केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली. केंद्र शासनाने अमरावतीत पहिल्या टप्प्यात ७०१८ घरांना मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार भविष्यात घरकूल निर्मितीचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेसाठी ज्या नागरिकांनी महापालिकेत आॅनलाईन अर्ज सादर केले अशा नागरिकांच्या मोबाईलवर ‘मॅसेज’ येत आहे. हा ‘मॅसेज’ केवळ अर्ज स्वीकारण्याचा असून कागदपत्रे ‘ओके’ असल्याचे हे संकेत आहे. ही योजना नागरी भागासाठी राबविण्यात आली आहे. महापालिकेत आतापर्यत ५२ हजार या योजनेसाठी अर्ज प्राप्प झाले आहे. त्यापैकी घटक क्र. ३ मध्ये ८६० तर घटक क्र. ४ मध्ये ६१५८ घरकुलांना शासनाने मान्यता प्रदान केली आहे. अर्ज स्वीकारणे ते आॅनलाईन पाठविणे आदी तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने मॅसटिफ नामक कंपनीकडे सोपविली होती. पहिल्या टप्प्यात पाठविलेल्या ७०१८ इतक्या घरकुलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जदारांना अर्ज परिपूर्ण असल्याचे संदेश येत आहे. आता या अर्जदारांना सायबर कॅफेमधून मोबाईलवर आलेला ‘मॅसेज’दाखवून पावती मिळेल. हीच पावती घरकूल योजनेसाठी पोच ठरेल.
- भास्कर तिरपुडे,
उपअभियंता, महापालिका.