शिक्षणमहर्षी बापूसाहेब देशमुख पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST2021-08-01T04:12:25+5:302021-08-01T04:12:25+5:30

कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विनोद रामेकर, मोहन देशमुख, भूपेंद्र नाईक निंबाळकर, पंकज ...

Meritorious students felicitated on the occasion of Shikshan Maharshi Bapu Saheb Deshmukh Punyatithi | शिक्षणमहर्षी बापूसाहेब देशमुख पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

शिक्षणमहर्षी बापूसाहेब देशमुख पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विनोद रामेकर, मोहन देशमुख, भूपेंद्र नाईक निंबाळकर, पंकज देशमुख, आनंद देशमुख, प्रभाकरराव कावळे, रवींद्र सहारे, मुख्याध्यापक देशमुख आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्च २०२१ च्या शालांत परीक्षेमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी जयश्री चौधरी, प्रतीक्षा पारणे, रेश्मा सहारे, आचला शेंडे यांना भेटवस्तू व अकरावीचे शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले. शिवाजीराव देशमुख, विनोद रामेकर व मोहन देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कृषक सुधार मंडळ अंतर्गत काशीखेड येथील कुष्ठरोगी आश्रम, तळेगाव स्थित स्व. नानासाहेब देशमुख मुलांचे वसतिगृह व माध्यमिक कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथी पार पडली. संचालन शिक्षिका पांडे यांनी केले. आभार शिक्षिका ठाकरे मानले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह राजू नागरीकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Meritorious students felicitated on the occasion of Shikshan Maharshi Bapu Saheb Deshmukh Punyatithi