तीन कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:10+5:302021-03-16T04:14:10+5:30
अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने सन २०१९-२० यावर्षीचे विभाग व राज्यस्तरावरील गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर केले. यामध्ये जिल्हा ...

तीन कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार
अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने सन २०१९-२० यावर्षीचे विभाग व राज्यस्तरावरील गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर केले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना विभागस्तरावरील पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहायक समीर लेंडे, कनिष्ठ सहायक मधुकर पवार आणि कृषी विभागातील कनिष्ठ सहायक नितीन नवाथे हे यंदाचे गुणवंत कर्मचारी आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. अशा काही योजना, प्रकल्प राबविताना संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्तेचा वापर करून उद्दिष्ट पूर्ण करण्यास साहाय्यभूत ठरतो. अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. त्यानुसार सन २०१९-२० या वर्षाचे पुरस्कार ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहेत. यात विभागात यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक प्रमोद देठे व बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीमधील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनाही बहुमान मिळाला आहे.