नववर्षात बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’
By Admin | Updated: December 10, 2015 00:18 IST2015-12-10T00:18:18+5:302015-12-10T00:18:18+5:30
नवीन वर्षात ९ मे रोजी बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’ होण्याची अनोखी खगोलीय घटना घडणार आहे. बुध आणि शुक्र ग्रह सूर्याच्या बाजूला असल्यामुळे यांचे अधिक्रमण होत असते.

नववर्षात बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’
अभ्यासकांना पर्वणी : ९ मे रोज घडणार अनोखी खगोलीय घटना
अमरावती : नवीन वर्षात ९ मे रोजी बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’ होण्याची अनोखी खगोलीय घटना घडणार आहे. बुध आणि शुक्र ग्रह सूर्याच्या बाजूला असल्यामुळे यांचे अधिक्रमण होत असते.या घटना दुर्मिळ असतात व खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी ठरतात.
यापूर्वी बुधाचे अधिक्रमण १ नोव्हेंबर १९९९, ७ मे २००३ व ८ मे २००६ वर्षी झाले होते. यापुढे ते ११ नोव्हेंबर २०१९, १३ नोव्हेंबर २०३२ व ७ नोव्हेंबर २०३९ वर्षी होणार आहे. यावेळी ग्रहाचा आकार व सूर्यापासूनचे अंतर इत्यादींबाबत गणिते मांडून निश्चित आकडेवारी मिळविली जाते. ही घटना पाहण्यासाठी सूर्याकडे पहावे लागत असल्यामुळे सुरक्षित सोलर चष्मे वापरणे आवश्यक आहे.
अधिक्रमण म्हणजे काय?
नववर्षात ९ मे रोजी सूर्य बिंबावरुन बुध ग्रहाचा एक ठिपका सरकत जाताना दिसणार आहे. याला खगोलीय भाषेत ‘अधिग्रहण’ म्हणतात. जेव्हा सूर्य, बुध व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमिवर बुध ग्रहाचा ठिपका सरकताना दिसतो. हा एक ग्रहणाचाच प्रकार आहे. परंतु बुध ग्रह पृथ्वीपासून लांब असल्यामुळे त्याचा आकार छोटा दिसतो. त्यामुळे तो सूर्यबिंबाला झाकू शकत नाही. म्हणूनच या घटनेला ‘अधिक्रमण’ म्हणतात.