दुकाने सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांची पालिकेत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:07+5:30
मोर्शी शहरामध्ये जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला तसेच कृषी उपयोगी साहित्याची दुकाने सुरू आहेत. परंतु शहरात असलेल्या स्टेशनरी, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक, गाडी पंक्चर दुरूस्ती यासारखी अनेक दुकाने दोन महिन्यांपासून बंद आहेत. नागरिक सुद्धा काही वस्तूंची मागणी या दुकानदारांना करीत आहेत. परंतु लॉकडाऊन मुळे दुकाने बंद आहे व ती वस्तू त्या ग्राहकाला देऊ शकत नाही.

दुकाने सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांची पालिकेत धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत. परिणामत: अनेक दुकानदारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील दुकाने सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्शी शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी नगरपालिकेत धाव घेतली.
मोर्शी शहरामध्ये जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला तसेच कृषी उपयोगी साहित्याची दुकाने सुरू आहेत. परंतु शहरात असलेल्या स्टेशनरी, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक, गाडी पंक्चर दुरूस्ती यासारखी अनेक दुकाने दोन महिन्यांपासून बंद आहेत. नागरिक सुद्धा काही वस्तूंची मागणी या दुकानदारांना करीत आहेत. परंतु लॉकडाऊन मुळे दुकाने बंद आहे व ती वस्तू त्या ग्राहकाला देऊ शकत नाही. मोर्शी तालुक्यांमध्ये आजच्या घडीला एकही कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही त्या कारणाने काही प्रमाणात का होईना नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या बाजारपेठेतील काही दुकाने सुरू करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकाºयांकडे करण्यात आली. आरोग्य सभापती सागर ठाकरे, माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनीही वस्तुस्थिती कथन केली. यावेळी विनोद ठोंबरे, अक्षय राऊत, किशोर मेघाणी, नवल अग्रवाल उपस्थित होते.