एकाधिकार योजनेला व्यापाऱ्यांचा सुरूंग
By Admin | Updated: September 26, 2016 00:41 IST2016-09-26T00:41:33+5:302016-09-26T00:41:33+5:30
धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आदिवासी उपयोजना (टीएसपी) मध्ये समाविष्ट असल्याने येथे धान्य खरेदी

एकाधिकार योजनेला व्यापाऱ्यांचा सुरूंग
श्यामकांत पाण्डेय धारणी
धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आदिवासी उपयोजना (टीएसपी) मध्ये समाविष्ट असल्याने येथे धान्य खरेदी एकाधिकार योजना लागू आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महामंडळाची खरेदी केंद्र सुरू झाल्यावर खासगी व्यापाऱ्यांना निवडक धान्य वगळता अनुसूचित प्रवर्गातील धान्य खरेदी करण्यास मनाई आहे.
एकाधिकाराला न जुमानता येथील व्यापारी वर्गाकडून अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून धान्य खरेदी केली जाते. मागील दोन वर्षांपासून बंद केलेला एकाधिकार पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
येत्या १ आॅक्टोबरपासून नवीन खरीप हंगामातील धान्य खरेदीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीनसह तूर, मूंग यासह अनुसूचित धान्य खरेदीस बंदी राहणार आहे. परंतु ही बंदी शिथिल ठेवण्यात यावी व आम्हास सोयाबीन खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी उप प्रादेशिक व्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे जोरकस प्रयत्नच चालवले आहे. या प्रकारामुळे उभय तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष माजला असून जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे.