साडेचार लाख दिल्यानंतरही विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:59+5:302021-04-08T04:13:59+5:30

अमरावती: लग्नानंतर सहा महिन्यातच विवाहितेचा सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केला. घर बांधण्याकरिता माहेरून साडेचार लाख आणण्यास सांगितले. ...

Mental and physical abuse of a married woman even after paying Rs 4.5 lakh | साडेचार लाख दिल्यानंतरही विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ

साडेचार लाख दिल्यानंतरही विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ

अमरावती: लग्नानंतर सहा महिन्यातच विवाहितेचा सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केला. घर बांधण्याकरिता माहेरून साडेचार लाख आणण्यास सांगितले. ते तिने आणलेसुद्धा; मात्र त्यानंतरही महिलेच्या पतीला भडकाविले व तिचा छळ करणे सुरूच ठेवले; मात्र छळ असह्य झाल्यामुळे

तिने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १ मे २०१८ ते ६ एप्रिल २०२१ दरम्यान मोहोकार ले-आऊट खडकी मंगरुळपीर रोड जि. अकोला येथे घडली.

नीलेश हरिदास तलवारे(३२), राजेंद्र ओंकारराव बेलोकार (४५), सुदर्शन धोतरे (५५), तसेच ५३ व ३१ वर्षीय महिला सर्व रा. मोहोकार ले-आऊट खडकी अकोला) आदींच्या विरुद्ध २७ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून भादंविचे कलम ४९८(अ), ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Mental and physical abuse of a married woman even after paying Rs 4.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.