शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मेळघाटच्या विद्यार्थ्याचा शाळेच्या पहिल्याच दिवशी अकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:37 PM

नांदेड जिल्ह्यातील व्हिलिंटन इंटरनॅशनल स्कूल वाडी येथील शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्यातील कारदा गावातील ८ वर्षीय चिमुकल्याचा २६ जूनला अचानक मृत्यू झाला.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यातील व्हिलिंटन इंटरनॅशनल स्कूलचा दुसरीचा विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नांदेड जिल्ह्यातील व्हिलिंटन इंटरनॅशनल स्कूल वाडी येथील शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्यातील कारदा गावातील ८ वर्षीय चिमुकल्याचा २६ जूनला अचानक मृत्यू झाला. श्रावण चंदू कासदेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दुसऱ्या इयत्तेत शिकत होता.२६ जूनला शाळा सुरू झाल्यामुळे त्याला नांदेड येथे शाळेत नेण्याकरिता सोमवार, २५ जूनला शाळेतील शिक्षक गोविन्द पवार, राजेश पोल हे शाळेची गाडी घेऊन कारदा येथे आले. पालकांनी श्रावणला आनंदाने गाडीत बसवले. मंगळवारी विद्यार्थी ५०० किमीचा प्रवास करून नांदेडला पोहचले. त्याच दिवशी श्रावणची प्रकृती बिघडल्याने त्याला शाळा व्यवस्थापनाने तेथीलच एका रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परंतु पालकांना फोनवर न कळविता बुधवारी सकाळी शिक्षक राजेश पोल, गोविंद पवार कारदा येथे पोहोचले. विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असतानासुद्धा पालकांना खोटी माहिती दिली. 'तुमच्या पाल्याची प्रकृती बिघडल्यामुळे तुम्ही नांदेडला आमच्यासोबत चला, असे सांगून घेऊन गेले. तेथे नेल्यानंतर त्यांना त्यांच्या चिमुकल्याचा मृतदेहच दाखविण्यात आला.

नांदेडलाच शवविच्छेदनश्रावणच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नांदेड येथीलच जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे मृत श्रावणच्या वडिलांनी सांगितले. गुरुवारी दुपारी श्रावणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे धारणी प्रकल्प अधिकारी गेडाम उपस्थित होते.

श्रावणने आमच्यासोबत लांब प्रवास केला. दरम्यान त्याला उलट्या झाल्या. तो अस्वस्थ झाल्याने लगेच रुग्णालयात भरती केले. परंतु, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला.- गोविन्द पवार, अधीक्षक व्हिलिंटन स्कूल, नांदेड

मला शिक्षकांनी खोटी माहिती देऊन शवविच्छेदनासाठी नांदेडला नेले. माझा मुलगा सोमवारी घरून सुस्थितीत गेला होता. त्याला कुठलाही आजार नव्हता. काहीतरी अनुचित घडल्यामुळेच त्याच्या मृत्यू झाला असावा.- चंदू कासदेकर, विद्यार्थी पालक, कारदा

टॅग्स :Deathमृत्यूSchoolशाळा