शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:47 IST

मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

- पंकज लायदे अमरावती - मेळघाटातील आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत. मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता महाराष्ट्रात यंदा नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे अशा चार मोठ्या शहरांमध्ये 'राखी महोत्सव'देखील साजरा केला जाणार आहे. मेळघाटातील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांच्या कौशल्याने तब्बल सव्वा लाख बांबू राख्या आकारास आल्या आहेत.धारणी तालुक्यातील लवादा येथे २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून कार्यरत संपूर्ण बांबू केंद्राने 'बांबू राखी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मेळघाटातील बांबू वापरून येथीलच आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या राख्या राज्यात आणि देशात उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनेही या संकल्पनेचे स्वागत केले असून, परिषदेच्या मदतीने विविध ३७ देशांमध्ये ही बांबू राखी पोहचविली जाणार आहे.

 सव्वा लाख राख्या महाराष्ट्रातील चार मोठ्या शहरांमध्ये यंदा राखी महोत्सव केला जाणार आहे. त्यातून मेळघाटच्या कारागिरांचे कौशल्यही राज्यातील नागरिकांसमोर येईल. सुमारे सव्वा लाख बांबू राख्या तयार करण्यात आल्या आहेत. धारणी जिल्ह्यातील लवादा येथेच या राखी बनविण्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना होईल.  विद्यार्थ्यांना किट्ससंपूर्ण बांबू केंद्राने राखी बनविण्याच्या ५० हजार किट्स उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील एक हजार शाळांशी संपर्क करून त्यांना या किट्स पुरविण्यात येतील. अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत बांबू राखीची संकल्पना पोहचविण्याचा आमचा विचार आहे, असे सुनील देशपांडे यांनी सांगितले. राखीचा ब्रँड महिला कारागिरांच्या नावेसुमारे ५० महिला आणि पुरुष कारागिरांनी तीन महिन्यांच्या मेहनतीतून तयार केलेल्या राख्यांना त्या महिला कारागिरांची तसेच पुरुष कारागिराच्या पत्नीचे नाव ब्रँडकरिता देण्यात आले. पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मेळघाटातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. तथापि, राखीमुळे सुमारे सात गावांमधील महिलांना स्थलांतर झालेले नाही. संपूर्णत: नैसर्गिक असलेली ही राखी महिलांना स्वाभिमानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन ठरली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनMelghatमेळघाटMaharashtraमहाराष्ट्र