मेळघाटच्या युवकाचा आंध्र प्रदेशात अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:23+5:302021-09-08T04:18:23+5:30
कामाच्या शोधात हजारो किलोमीटर स्थलांतर चिखलदरा (अमरावती ) : कामाच्या शोधात आंध्र प्रदेशात गेलेल्या लखन मोतीराम मावस्कर (२७, रा. ...

मेळघाटच्या युवकाचा आंध्र प्रदेशात अपघाती मृत्यू
कामाच्या शोधात हजारो किलोमीटर स्थलांतर
चिखलदरा (अमरावती ) : कामाच्या शोधात आंध्र प्रदेशात गेलेल्या लखन मोतीराम मावस्कर (२७, रा. गिरगुटी) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. कामाच्या शोधात त्याने २० दिवसांपूर्वीच हजारो किलोमीटर स्थलांतर केले होते.
मृत लखनच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० दिवसापूर्वी गिरगुटी, धरमडोह परिसरातील ३० आदिवासी युवक आंध्र प्रदेशच्या पीरूनाला येथे सूर्या सेम या चुना बनविण्याच्या फॅक्टरीत कामाला गेले होते. सोमवारी रात्री १२ वाजता लखन हा रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेत रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याचा मृत्यू झाला, तर शालिग्राम नामक सहकारी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. सहकारी उमेश भुसुम, सूरज दारसिंबे, संजय बेलसरे, शालिकराम मावस्कर हे त्याचे शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह घेऊन परत निघाले असल्याचे ‘लोकमत’ला सांगतले. लखनला सहा महिन्यांची मुलगी व म्हातारे आई-वडील आहेत. १२ हजार रुपये मासिक वेतनावर मेळघाटातील हे युवक आंध्र प्रदेशात कामाला गेले होते.
बॉक्स
दलाल नेतात विविध राज्यात
मेळघाटातील युवक मोठ्या प्रमाणात अंगमेहनतीची कामे करतात. कमी पैशात जास्त काम होत असल्याने आंध्र प्रदेशसह तेलंगणा, दिल्ली व इतर राज्यात दलालांच्या माध्यमातून २० ते २५ युवकांचे टोळके परराज्यात कामाला नेले जाते. त्यातूनच मोठ्या प्रमाणात फसगत तसेच प्रसंगी अपघाती मृत्यू होतात. या युवकांना नेणारा युसूफ अली नामक दलालाशी ‘लोकमत’ने बोलणी केली असता, मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
लखन रस्ता ओलांडत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. पीरूनाला येथे आम्ही ३० युवक २० दिवसांपूर्वी कामाला आलो होतो. लखनचा मृतदेह घेऊन आम्ही निघालो आहोत.
- उमेश भुसुम, सहकारी, धरमडोह
070921\1645-img-20210907-wa0082.jpg
आंध्रप्रदेशात अपघाती मृत्यू झालेला लखन मावस्कर