मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:06+5:302021-04-02T04:13:06+5:30
चुरणी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील खोंगडा वर्तुळ अंतर्गत येणाऱ्या वनखंड क्रमांक ९४२, ९४३, ९४९ व ९५० मध्ये मंगळवार दुपारपासून ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला आग
चुरणी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील खोंगडा वर्तुळ अंतर्गत येणाऱ्या वनखंड क्रमांक ९४२, ९४३, ९४९ व ९५० मध्ये मंगळवार दुपारपासून लागलेल्या आगीत ३० ते ४० हेक्टर जंगल जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जामली तसेच चिखलदरा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून आग आटोक्यात आणली. या आगीत मोठ्या प्रमाणात सागवान वृक्ष तसेच मौल्यवान वनसंपदा जळाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल व चिखलदराचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल भैलुमे यांच्यासोबत वनपाल सुरेश सोळंके, वनपाल सचिन नवरे, वनरक्षक विजय गुलरेकर, राहुल वडे, बोरकर, मोरे, मीना कासदेकर, प्रकाश शनवारे, चेतन हिवराळे यांनी ब्लोअर मशीनच्या साह्याने आग विझवण्याचे कार्य केले. ---------------