शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

मेळघाटचा टँकर पळविला

By admin | Updated: April 30, 2017 00:12 IST

गत महिनाभरापासून तालुक्यातील १५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन टँकरने सहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

आदिवासींची भटकंती : तारुबांद्यात उपसभापतींना घेराव, १५ गावांत पाणी पेटलेचिखलदरा : गत महिनाभरापासून तालुक्यातील १५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन टँकरने सहा गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मेळघाटसाठी जिल्ह्यातून पाठविलेला टँकर परस्पर चांदूररेल्वे तालुक्यात पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील पल्लई, लवादा, आलापोट, भांडी ढोमणीफाटा, तारूबांदा या सहा गावांना पाणी पुरवठा केला जात असून, एक महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झलेल्या तारुबांदा, बदनापूर, ठोबनबल्डी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, गौलखेडा बाजार, आठवनदी, मनभंग, भिलखेडा या गावातसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. सचिव बेपत्ता, अपूर्ण प्रस्ताव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सचिव मुख्यालयी न राहता परतवाडा, अमरावती येथून ग्रामपंचायतींचा कारोबार पाहत असल्याने त्याचा फटका आदिवासींना बसला आहे. पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकांकडून प्रस्ताव न पाठविले, अपूर्ण पाठविल्या जात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी )टँकरची पळवापळवीचिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईग्रस्त गावे पाहता जिल्हास्तरावरून टँकरचे नियोजन करण्यात आले. मात्र, येथे येणारा टँकर चांदूररेल्वे तालुकयातील या गावी १५ दिवसांपूर्वी पळविला. परिणामी तारुबांदा येथे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कुणी फिरविला याची तपासणी करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी केली आहे. तारूबांदा येथे आदिवासींनी गुरूवारी रात्री त्यांना पाण्यासाठी घेराव घातला. माजी आमदारांच्या गावात पाणीटंचाईमेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे व विद्यमान सभापती कविता काळे यांच्या गौलखेडा बाजार या गावात पाणीटंचईची समस्या उद्भवली असून, तेथेसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.विहिरी अधिगृहितटँकरसह पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कोरडा, वस्तादूर, कालापाणी, टंडू, मल्हारा, चिखली येथील विहिरी आणि बोअरवेल अधिगृहित करण्यात आले आहे. मात्र, टँकरच नसल्याने अनेक गावात प्रशासनाच्या लापरवाहीने आदिवासंींना पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. सहा गावांमध्ये तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. - सैफन नदाफ, तहसीलदार, चिखलदरा