मेळघाटात चाकूच्या धाकावर बाप-लेकांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST2021-04-20T04:14:09+5:302021-04-20T04:14:09+5:30

फिरोज खान दिलावर खान (२१, दिलावरपुरा, अचलपूर) आणि जय नारायण हिंगणकर (विलायतपुरा, अचलपूर) अशी लुटारू आरोपींची नावे आहेत. पोलीस ...

In Melghat, Baap-Lek was robbed with a knife | मेळघाटात चाकूच्या धाकावर बाप-लेकांना लुटले

मेळघाटात चाकूच्या धाकावर बाप-लेकांना लुटले

फिरोज खान दिलावर खान (२१, दिलावरपुरा, अचलपूर) आणि जय नारायण हिंगणकर (विलायतपुरा, अचलपूर) अशी लुटारू आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर बेलसरे (२८) आणि त्याचे वडील हिराजी बेलसरे (४५, रा. सलोना) हे त्यांच्या वाहनाने परतवाडा येथे १० एप्रिल रोजी गेले होते. परतवाडा येथे त्यांनी एटीएममधून पैसे काढले. खरेदी केली. ते परत गावी जाण्यासाठी निघाले असताना, बिहाली गावाजवळ दुपारी दोनच्या सुमारास मागून दुचाकीवर बसून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी किशोर बेलसरे यांची दुचाकी ओव्हरटेक करून आडवी लावून थांबवली. तुम्ही पोत्यात काय घेऊन चालले आहात? आम्ही पोलिसांचे खबरी आहोत, असे म्हणत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पँटच्या खिशात हात घालून २५ हजार ८०० रुपये काढून घेतले.

सदर घटनेबाबत किशोर बेलसरे यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ते सीसीटीव्ही फुटेज सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रूपनर यांनी एलसीबी पाठवले. एलसीबीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून गुन्हा करणाऱ्या दोन आरोपींना पकडले. पुढील तपास ठाणेदार अशोक वाढीवे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रूपनर व सहकारी कर्मचारी करीत आहेत.

Web Title: In Melghat, Baap-Lek was robbed with a knife