मेकला अपयशी

By Admin | Updated: June 26, 2014 22:59 IST2014-06-26T22:59:55+5:302014-06-26T22:59:55+5:30

पाच पोलिसांचे वास्तव्य असलेल्या वस्तीत बुधवारच्या रात्री चोरांनी घरफोड्या करून लूट केली. पोलिसांचे वास्तव्य असलेल्या मोहल्याचे हे हाल असतील तर सामान्यांचे काय, याची कल्पना न केलेलीच बरी.

Mela Failure | मेकला अपयशी

मेकला अपयशी

पुन्हा दोन घरफोड्या : पोलिसांचीच वस्ती लुटली
अमरावती : पाच पोलिसांचे वास्तव्य असलेल्या वस्तीत बुधवारच्या रात्री चोरांनी घरफोड्या करून लूट केली. पोलिसांचे वास्तव्य असलेल्या मोहल्याचे हे हाल असतील तर सामान्यांचे काय, याची कल्पना न केलेलीच बरी. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्या नेतृत्त्वात पोलीस दलाचा चोर, गुन्हेगारांवर वचक संपल्याचे हे आणखी एक नवे उदाहरण आहे.
तीन महिन्यांपासून चोरट्यांनी अमरावतीकरांची झोप उडविली आहे. दरदिवशी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीच्या एकापेक्षा अधिक घटना घडत आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या सर्वाधिक घटना घडल्या. जून महिन्यातील २५ दिवसांत दहा घरफोड्या घडल्या असताना अणखी दोन घरफोड्यांची भर त्यात पडली. गोपालनगर परिसरातील कैलासनगर येथे एकाच रात्री दोन घरफोड्या करुन पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला. विजय सिताराम सावरकर (६०) व सुभाष वासुदेव इंगळे (४०,रा. कैलास नगर) यांची घरे चोरांनी फोडली.
विजय सावरकर हे वीज वीतरण कार्यालयातून लाईनमन पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. बुधवारी ते कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातून चांदीच्या तोरड्या, चांदीचे जोडवे, मोबाईल, रोख १७ हजार रुपये लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा सुभाष इंगळे यांच्या घराकडे वळविला. सुभाष यांच्या मुलाची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी ते रुग्णलयात मुलाजवळ थांबले होते. मुख्य दाराचा कोंडा तोडून घरातील १० गॅ्रम सोन्याचे दागिने व रोख ४ हजार रुपये चोरले. दोन्ही घरातून एकूण ५० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटना गुरुवारी सकाळी उघडकीस येताच कैलासनगर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. भगत, उपनिरीक्षक बी. आर. बंदखडके घटनास्थळी पोहोचले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घरफोडीचा गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)

Web Title: Mela Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.