आदिवासी संस्कृतीच्या मेळघाटात मेघनाथ यात्रेची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:39 PM2019-03-24T22:39:22+5:302019-03-24T22:39:48+5:30

आदिवासींचा सर्वात मोठा सण होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाथ यात्रेला प्रारंभ झाला. तालुक्यात जेथे आठवडी बाजार भरतो, तेथे ही यात्रा भरते. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे शेकडो आदिवासींनी रुढीप्रमाणे मेघनाथ यात्रेत पूजाअर्चा करीत नवस फेडले. पान-विडाच्या दुकानात आदिवासी युवक युवतींना पसंती दर्शवित लग्नाच्या बेडीत अडकले.

Meghnath yatra of Melghat in Tribal culture | आदिवासी संस्कृतीच्या मेळघाटात मेघनाथ यात्रेची धूम

आदिवासी संस्कृतीच्या मेळघाटात मेघनाथ यात्रेची धूम

Next
ठळक मुद्देपारंपरिक यात्रा : अनेकांनी फेडला नवस, एका विड्यात आटोपले लग्न

नरेंद्र जावरे/मारोती पाटणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा/ चुरणी : आदिवासींचा सर्वात मोठा सण होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाथ यात्रेला प्रारंभ झाला. तालुक्यात जेथे आठवडी बाजार भरतो, तेथे ही यात्रा भरते. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे शेकडो आदिवासींनी रुढीप्रमाणे मेघनाथ यात्रेत पूजाअर्चा करीत नवस फेडले. पान-विडाच्या दुकानात आदिवासी युवक युवतींना पसंती दर्शवित लग्नाच्या बेडीत अडकले.
रावणपुत्र 'मेघनाथच्या नावाने मेळघाटात आजही वंशपरंपरागत यात्रा भरते. जारिदा व काटकुंभ येथे परिसरातील डोमा, काजलडोह, बामदेही, बगदरी, कनेरी कोयलारी, पाचडोंगरी, खंडूखेडा, चुनखडी खडीमल, माखला, गंगारखेडा, कोटमी, दहेंद्री, पलस्या, बुटीदा, चुरणी, कोरडा, कालिपांढरी आदी ५० ते ६० गावांतील आदिवासी व गैरआदिवासींनी यात्रेत हजेरी लावली. घरातील लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आजारी पडला तर गावातील मांत्रिकाकडे जाऊन प्रथम उपचार केला जातो.
पान विड्यात लग्न, ढोल-ताशे, नगारे
ढोल, नगारे, डफली, ताशे वाजवित गदली नृत्याने यात्रेची रंगत वाढविली जाते. त्यासाठी बगदरी, काजलडोह, कोटमी, कोयलारी, पलासपानी येथील पथक कार्यरत असते. युवक-युवती एकमेकाला पसंत करून व मीठापान देऊन पळून जातात. आई-वडील मुलीला शोधून पंचासमक्ष हुंडा ठरविण्याची पद्धत रुढ झाली आहे.
खांबाला बांधून प्रदक्षिणा, शेकडो नारळ फुटले
ज्यांनी नवस कबूल केला. तो पूर्ण झाल्यानंतर मेघनाथबाबाजवळ बसलेल्या भूमकाकडे पूजा-अर्चा केली जाते. तेथे ऐपतीप्रमाणे कोंबडा किंवा बोकूड दिला की आडव्या खांबाला नवस कबूल करणाºयास बांधले जाते. खाली दोन इसम त्या दोरीच्या साह्याने सहा प्रदक्षिणा घालतात. तीन वेळा सरळ व विरुद्ध दिशेने प्रदक्षिणा घातल्या जातात. नवसफेड करून पूजेची समाप्ती होते.

Web Title: Meghnath yatra of Melghat in Tribal culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app