वाहतूक व्यवस्था सुधारणेसंबंधी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST2021-07-30T04:13:44+5:302021-07-30T04:13:44+5:30
शहरातील रस्ते बांधकाम खुप संथगतीने होत असल्याचे निर्दशनास आल्याने सदरचे काम जलद गतीने करणे, जवाहर गेट ते प्रभात चाैक ...

वाहतूक व्यवस्था सुधारणेसंबंधी बैठक
शहरातील रस्ते बांधकाम खुप संथगतीने होत असल्याचे निर्दशनास आल्याने सदरचे काम जलद गतीने करणे, जवाहर गेट ते प्रभात चाैक व दीपक चाैक ते जयस्तंभ चाैक येथे वन-वे चे बोर्ड लावणे. शहराकरिता मंजूर असलेले सीसीटीव्ही प्रोजेक्क्टची कार्यवाही जलद गतीने करणे, लाॅकडाऊन दरम्यान वेळेचे पालन करीत नसलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई पथकाचे संख्येत वाढ करणे व पोलस प्रशासनासह संयुक्त कारवाई करणे, पोलीस कर्मचारी निवास्थानाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करणे, रस्ता दुभाजक व स्पीड ब्रेकर यासंबंधाने प्राप्त तक्रारीचे निवारण करण्याकरिता कमिटी स्थापन करुन त्यात मनपा, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, विद्युत महामंडळ, जीवन प्राधिकरण विभागातील सदस्यांद्वारे निर्णय घेऊन समस्यांचे निराकरण करणे, वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगर पालिका सीमा क्षेत्र प्रारंभ अशा प्रकारचे बोर्ड लावणे, , रस्त्यांवर जेथे वाहनांना वेग मर्यादा आणलेली आहे तेथे तसे बोर्ड दर्शनीय भागात लावणे आदी सूचनांचा यात समावेश आहे.