चांदूररेल्वेमध्ये सभापतीची निवड न होताच सभा समाप्त
By Admin | Updated: May 20, 2016 00:15 IST2016-05-20T00:15:32+5:302016-05-20T00:15:32+5:30
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या विशेष आदेशानुसार, चांदूररेल्वे नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपद निवडीसाठी पीठासीन अधिकारी

चांदूररेल्वेमध्ये सभापतीची निवड न होताच सभा समाप्त
सदस्यांची उपस्थिती : सभापतीपदासाठी नामांकन नाही
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या विशेष आदेशानुसार, चांदूररेल्वे नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपद निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात १६ मे रोजी घेण्यात आली. परंतु सदस्य उपस्थित असताना सभापतीपदासाठी एकही नामांकन अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे दाखल झाला नाही. नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ १० ते १२ मेपर्यंत होती.
विशेष सभा सोमवारी विषय समितीच्या सभापती पदासाठीच बोलाविण्यात आली. परंतु सभापती पदासाठी सत्तारुढ किंवा विरोधकांकडून एकही नामांकन दाखल न झाल्याने नगरपरिषदेच्या इतिहासात ही अजब सभा ठरल्याची चर्चा आहे.
१० मे रोजी नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सदस्याची निवड करण्यात आली. त्यानंतर विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा १६ मे रोजी बोलाविण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिला होता. ठरल्याप्रमाणे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते सभागृहात हजर झाले. सभागृहात ते १० ते १२ वाजतेपर्यंत सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषदेत निर्वाचित १७, स्वीकृृत २ सदस्य आहे. निर्वाचित १७ पैकी १४ तर स्विकृतचे २ नगरसेवक हजर होते. सुरेश यादव, सुनंद सिरसाम, वैशाली कोरडे हे नगरसेवक या सभेला अनुपस्थित होते. सदस्य हजर असताना सभापती पदासाठी अर्ज न आल्याने या सभेची कार्यवाहीने १२ नंतर सभा संपल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. प्रशासनात वरिष्ट सतरावरून शासन तुमच्या दारी असताना नगरपरिषद प्रशासन कोणत्या दारी आहे, याबाबत नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर विशेष चर्चा सुरू होती. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मात्र श्रीमती गीता ठाकरे १५ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर सभेला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)