प्रभारी सभापतीच्या उपस्थितीत शिक्षण समितीची सभा
By Admin | Updated: January 10, 2017 00:31 IST2017-01-10T00:31:53+5:302017-01-10T00:31:53+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीची सभा सोमवारी प्रभारी शिक्षण समितीचे एक दिवसीय सभापती तथा झेडपी सदस्य बापुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रभारी सभापतीच्या उपस्थितीत शिक्षण समितीची सभा
आढावा बैठक : शिक्षण विभागाच्या विविध मुद्यांवर चर्चा
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीची सभा सोमवारी प्रभारी शिक्षण समितीचे एक दिवसीय सभापती तथा झेडपी सदस्य बापुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिक्षण विभागाच्या विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी मागील सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करणे, शासकीय परिपत्रकाचे वाचन करणे, शिक्षक पुरस्काराबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. याशिवाय केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदाचा आढावा, तसेच वर्गखोल्या दुरूस्तीवर उपलब्ध निधी व अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीचे विद्यमान सभापती गिरीश कराळे हे बैठकीला उपस्थित नसल्याने सभेसाठी उपस्थित असलेला कोरम असल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी एक दिवसीय सभापती म्हणून जि.प. सदस्य मनोहर सुने यांनी बापुराव गायकवाड यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास सदस्यांनी एकमताने सहमती दिली. त्यामुळे शिक्षण समितीची मासिक सभा गायकवाड यांच्या अध्यतेखाली पार पडली. सभेला समितीचे सदस्य मोहन पाटील, मनोहर सुने, दयाराम काळे, चंद्रपाल तुरकाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)