विदर्भस्तरीय वधू-वर मेळावासंदर्भात सोमवंशी आर्य क्षेत्रीय समाजाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST2021-07-01T04:10:39+5:302021-07-01T04:10:39+5:30

अमरावतीत बैठक पार पडली. २७ जून रोजी कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अमर सोनवळकर त्यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष ...

Meeting of Arya Kshetriya Samaj on Monday regarding Vidarbha level bride and groom meet | विदर्भस्तरीय वधू-वर मेळावासंदर्भात सोमवंशी आर्य क्षेत्रीय समाजाची बैठक

विदर्भस्तरीय वधू-वर मेळावासंदर्भात सोमवंशी आर्य क्षेत्रीय समाजाची बैठक

अमरावतीत बैठक पार पडली.

२७ जून रोजी कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अमर सोनवळकर त्यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष नितीन वानखडे यांनी केले. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्थेच्या वेबसाईटचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थित पार पडले. यात गजानन डवले यांचे सहकार्य मिळाले. विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून मनोज बिंड (नागपूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष नीलेश मानेकर व उपाध्यक्ष नितीन वानखडे, सचिवपदी विजय मानेकर, यवतमाळ तसेच सहसचिव दीपकज सूर्यवंशी, वाशिम व कोषाध्यक्ष विजय तायवाडे (नागपूर), सहकोषाध्यक्ष अमर सोनवळकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मानेकर (यवतमाळ) यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोद बिंड, चंदू बिंड व अचलपूरचे धर्मेन्द्र घोटेकार, वाशिमचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सुधीर सोनटक्के हे होते. आभार प्रदर्शन अर्चना गोलाईतकर यांनी केले.

Web Title: Meeting of Arya Kshetriya Samaj on Monday regarding Vidarbha level bride and groom meet