शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील ‘मेडिकेअर’ कोलमडली; मोटरबाइक अ‍ॅम्ब्युलन्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 17:28 IST

जिल्हा शल्यचिकित्सकांचा लक्षवेध

परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील गरजू आदिवासींना तातडीची वैद्यकीय सेवा पुरविणाºया मोटरबाइक अ‍ॅम्ब्यूलन्स कित्येक दिवसांपासून बंद पडल्या आहेत. मेळघाटातीलआरोग्य व्यवस्थेत एक वर्षापूर्वी दाखल या अ‍ॅम्ब्यूलन्स हतरू, हरिसाल, काटकुंभ, बैरागड व टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात धूळखात उभ्या आहेत. येथे या अ‍ॅम्बुलन्स आहेत. यातील हतरू, काटकुंभ येथील अ‍ॅम्ब्यूलन्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

‘शिव आरोग्य, महाराष्ट्र शासन’ असे नमूद नव्या कोºया या बाइक औषधी व ऑक्सिजन सिलिंडरसह तैनात आहेत. बी.एस्सी. नर्सिंगचा अभ्यासक्रम आणि लाइफ सपोर्टिंग प्रशिक्षित तज्ज्ञ मोटरबाइकरकडून या अ‍ॅम्ब्यूलन्स नियंत्रित केल्या जातात. जेथे रस्ते अरुंद आहेत, चार चाकी अ‍ॅम्ब्यूलन्स पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी या मोटरबाइक अ‍ॅम्ब्यूलन्स उपयोगी आहेत. आदिवासींकरिता त्या जीवनदायी ठरल्या होत्या. मात्र, नव्याने नऊ दिवस याप्रमाणे ती यंत्रणा अल्पवेळ धडाक्यात चालली व प्रथेप्रमाणे बंद पडली. 

  दरम्यान, या अ‍ॅम्ब्यूलन्सवर तैनात तज्ज्ञ कर्मचाºयांना ३० हजारांवरून १६ हजार रुपयेच वेतन देण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे. याचाही फटका मोटरबाइक अ‍ॅम्ब्यूलन्सला बसला आहे. यामुळे काहींनी नोकरी सोडली, काही नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. मेळघाटातील या मोटरबाइक अ‍ॅम्ब्यूलन्सचे नियंत्रण अथवा त्याविषयीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे नाही, तर बंद पडलेल्या, धूळखात उभ्या मोटरबाइक अ‍ॅम्ब्यूलन्समुळे मेळघाटातील आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.

१ ऑगस्ट २०१७ रोजी कार्यान्वितबाइक अ‍ॅम्ब्यूलन्स सेवेचा शुभारंभ १ ऑगस्ट २०१७ रोजी झाला. ही मोफत सेवा १०८ या क्रमांकावर उपलब्ध आहे. पहिल्याच दिवसापासून विविध स्तरांतून या सेवेला प्रतिसाद मिळाला. अरुंद रस्ते, अतिदुर्गम परिसर या ठिकाणाहून बाइक अ‍ॅम्ब्यूलन्सला मोठ्या प्रमाणात कॉल होते. मात्र, त्या अ‍ॅम्ब्यूलन्स आता मेळघाटच्या रस्त्यावरून बेपत्ता झाल्याने ही यंत्रणा कोलमडली आहे. 

बाइक कशासाठी? अरुंद रस्ते व डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे, त्या ठिकाणी या बाइक अ‍ॅम्ब्यूलन्सने सहजरीत्या पोहचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, नंदूरबार, मेळघाट अशा दुर्गम भागांत  बाइक अ‍ॅम्ब्यूलन्सच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आली होती.

टॅग्स :MelghatमेळघाटHealthआरोग्य